उद्या बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी महा एल्गार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
तर याच मेळाव्याच्या अनुषंगाने भोगलवाडी आणि परिसरामध्ये बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. याच मेळाव्याचे माजलगाव तालुक्यातील भोगलवाडी फाटा येथे लावण्यात आलेले बॅनर,
अज्ञात समाजकंटकांनी पाडले आणि त्या जागेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर लावले. यामुळे भोगलवाडी फाटा परिसरामध्ये ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले असून समाजकंटकाचा निषेध देखील व्यक्त केला आहे .

टिप्पणी पोस्ट करा